एखाद्या नव्या गोष्टीचे 'नऊ दिवस' संपले की त्यातली गंमत निघून जाते आणि मग त्याची सवय होऊन जाते. मला अजून आठवते, माझ्या लहानपणी पहिला TV घरी आल्यावर तो पाहताना किती अपूर्वाई वाटायची. तीच गोष्ट Cable TV ची. त्यानंतरच्या काळात - म्हणजे साधारण college मध्ये असताना - technology आणि innovations इतक्या झपाट्याने बदलत गेले की ही list बरीच वाढत गेली.
त्यातल्या त्यात Personal Computer हा ह्या सगळ्यांचा बाप मानावा लागेल. जुन्या काळी जसे bronze age, iron age होऊन गेले (किंवा आपल्या भाषेत सांगायचे तर द्वापारयुग, त्रेतायुग वगैरे), तसे Computer हे खर्या अर्थाने 'युग' म्हणायला काही हरकत नाही. परवाच YouTube वर Steve Jobs आणि Bill Gates ह्यांची एकत्रित मुलाखत असलेला video पहात होतो. त्यांना जेव्हा विचारले की, इतकी वर्षे सगळेजण computer वापरताहेत. बाकीच्या कितीतरी technologies बदलल्या आहेत उदा. processors बदलले, त्यामुळे processing speed हजारपटीने वाढला, नव्या operating systems आल्या, internet ने तर सगळे जग बदलून टाकले. तरीही बरेचसे input/output devices (mouse, keyboard) अजून तेच आहेत, त्यामध्ये फारसा फरक नाही. असे का? तेव्हा Steve Jobs म्हणाला, की आपण जेव्हा car चालवतो, तेव्हा आपल्याला steering, gears ची इतकी सवय झालेली असते की उद्या ह्याच जागी दुसरे काही बसवले तर आपली भंबेरी उडेल. तसेच mouse, keyboard, touchpad ह्या गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. नाही म्हणायला Microsoft Surface सारखी नवी technology कदाचित हे सगळे बदलून टाकेल; पण Bill Gates ने सांगितल्याप्रमाणे हे commodify व्हायला अजून बराच वेळ लागेल.
तर सांगायचा मुद्दा हा की नव्या वस्तूंची एकदा सवय झाली की त्या वस्तूचे नवेपण जाते . तुम्ही पहा, Canon चा नवा digital camera घेतल्यावर सुरूवातीला सगळ्यांचे photos काढून होतात, नंतर एकतर तो camera तसाच पडून रहातो किंवा कधीतरी trip ला गेल्यावर वापरला जातो. एखादी नवी CD किंवा DVD (कोणत्यातरी movie ची किंवा नाटकाची) आणली की १-२ वेळा बघून होते. काही वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. तम्ही Nokia चा एखादा नवीव handset घेतला की सगळे features वापरून झाल्यावर २-३ आठवड्यांनतर त्याचे कौतुक संपते आणि तो आपल्या TV, radio सारखा एक routine चा भाग होतो. XBox, PS3 ची हीच गत.
मी पहिला iPod घेतला तेव्हा काय ऐकू आणि काय नको असे झाले. थोड्या दिवसांनी मग कुठेही बाहेर जाताना घराची किल्ली, पाकीट याबरोबरच iPod ही न विसरता पॅंटच्या खिशात शिरू लागला. गंमत म्हणजे london मध्ये कुठेही फिरताना, पांढरे earphones घालून iPod ऐकणाऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतात. शिवाजी महाराजांच्या काळात जशी 'हर हर महादेव' च्या जल्लोषांनी भारावून गेलेली मावळ्यांची पिढी होती तशीच ही iPod generation...(iPod जरी तलवारीसारखा वापरता आला नाही तरी 'गरजा महाराष्ट्र माझा' हे गाणे त्यावर नक्की ऐकता येते!)
काही महिन्यांनी iPod ची लाट अोसरली (खरे तर iPod shuffle, iPod mini, iPod nano च्या रूपाने ह्या लाटा येतच राहिल्या). तेवढ्यात अजून एक मोठी लाट आली, iPhone ची. ही मात्र अजून अोसरायची आहे. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर generally कोणत्याही नव्या वस्तूचे माझे आकर्षण २-३ आठवड्यात निघून जाते.. MacBook सारख्या वस्तूसाठी फार तर ७-८ आठवडे :-)
पण iPhone हा अपवाद म्हणायला लागेल. आठ महिन्यांपूर्वी आणलेल्या ह्या 'हिऱ्या'ने अजूनही आपले नवे रंग दाखवणे सोडलेले नाही. एकतर multitouch screen, in-built accelerometer, साधाच पण आकर्षक interface ह्या सगळ्या करामतींमुळे, पानाचा विडा जसा जमून येतो, तसा हा अगदी 'जमून' गेलाय! त्यात कहर म्हणजे ह्या करामतींचा खुबीने उपयोग करणारे शेकडो 3rd party applications.... आणि इथेच खरी गंमत सुरू होते. वेगवेगळ्या भाषांच्या dictionaries व translations, eBooks, scientific calculator, off-line wikipedia व google maps, unit converters... एक ना दोन, हजारो सुविधा... शिवाय Apple ची applications आहेतच - safari, weather, calendar, maps, iPod वगैरे. परवाच एक iPhysics नावाचे मजेदार application टाकले. ह्यामध्ये तुम्ही तुमच्या बोटांनी iPhone च्या screen वर कोणताही आकार (वर्तूळ, त्रिकोण) तयार करायचा; तो आकार आपोआप gravity follow करून screen च्या खालच्या दिशेला सरकतो. अजून एका application मध्ये (iAno) तुम्हाला iPhone वर piano च्या keys वाजवता येतात.
मी iPhone घेतल्यापासून एक वेगळेच addiction सुरु झालेय (अर्थात iPhone हेच केवढे मोठे addiction अाहे म्हणा). रात्री झोपताना iPhone वर wikipedia वाचत बसणे आणि YouTube वर ३-४ videos पहाणे. घरी Wi-Fi असल्याने उठता-बसता internet वापरता येते. गेल्या शुक्रवारची गोष्ट. शुक्रवारची संध्याकाळ आली की weekend ला काय-काय करायचे याची यादी करताना रात्र कधी होते ते कळतच नाही. त्यात आम्ही पडलो निशाचर; रात्री लवकर झोपही येत नाही. पडल्या-पडल्या YouTube वर पु.लं. च्या 'बटाट्याच्या चाळी'ची एक video clip बघितली. सहज गंमत म्हणून 'bharat jadhav' चा search देऊन पाहिला. List मध्ये 'Mukkampost London Part1' दिसले. चित्रपटाचे trailer असेल म्हणून tags बघितले, तर 'भरत जाधव, केदार शिंदे, मोहन जोशी' या मंडळींची नावे दिसली. चला.. केदार शिंदे आणि भरत जाधव म्हणजे फक्कडच असणार. ती १० मिनिटांची clip म्हणजे 13 parts च्या आख्ख्या चित्रपटाचा पहिला part होता. ती clip संपल्यावर लगेच दुसरी सुरू केली, ती होती न् होते तोच तिसरी.. आता सगळा पिक्वर बघून झाल्याशिवाय झोपायचेच नाही असे ठरवले. नाहीतरी शुक्रवारी रात्री झोपायला २-२.३० वाजतातच.
केदार शिंदेचे सार्थ दिग्दर्शन, विषयाची साधीसरळ हाताळणी आणि त्यात पुन्हा भरत जाधव, मोहन जोशीसारखे कलाकार! चित्रपटाचा विषय जरी हिंदी चित्रपटांपर बेतलेला असला तरी मराठमोळ्या विनोदामुळे व सादरीकरणातील कौशल्यामुळे 'मुक्कामपोस्ट लंडन' हा इतर हिंदी चित्रपटांपेक्षा नक्कीच सरस आहे. कदाचित मी लंडनमध्ये राहिलो असल्याने मला हा विषय जास्त जवळचा वाटला असेल; पण 'नमस्ते लंडन' आणि 'भागम्भाग' सारख्या london-oriented मूवीजपेक्षा 'मुक्कामपोस्ट लंडन' कधीहि चांगला आहे. तेरा भागांच्या सिनेमापैकी जेव्हा part 9 बघून झाला तेव्हा सहज घड्याळाकडे नजर गेली तर पहाटेचे साडेचार वाजले होते. शेवटी सव्वापाचला जेव्हा 'the end' झाला तेव्हा माझे मलाच हसू आले. अनपेक्षित मिळालेल्या आनंदामुळे असेल कदाचित. iPhone वर पाहिलेला हा पहिला मराठी चित्रपट. काहीजणांना वाटेल की हे म्हणजे तंत्रज्ञानाच्या अति-आहारी जाणे आहे. असेलही. प्रत्येकाला आपल्या आनंदांची स्थाने ठाऊक असतात; काही जणांसाठी ही स्थाने म्हणजे पुस्तके, adventures, क्रिकेट तर काहीजणांसाठी ती Google, Wikipedia, YouTube असली तर काय बिघडले.
आइन्स्टाइनचे एक वाक्य आहे - A table, a chair, a bowl of fruit and a violin; what else does a man need to be happy?
त्याच चालीवर म्हणायचे झाले तर - An iPhone, a wi-fi, a google and a wikipedia; what else does a man need to be happy?
No comments:
Post a Comment